
दिनांक: २२/०७/२०२६
सावंतवाडी: शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांचा वाढदिवस शिवसैनिकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिनेश गावडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचे कौतुक केले.
या प्रसंगी तालुकाप्रमुख बबन राणे, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, रमाकांत राऊळ, आनंद वरक, संजय गावडे, स्वप्नील परब, नंदू गावडे, बबन गावडे, यश गावडे, परेश सोंसुरकर, देव्रत राऊळ, क्लेटस फर्नांडीस, वामन नार्वेकर, सचिन साटेलकर तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थितांनी दिनेश गावडे यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
