
सिंधुदूर्ग: संपादकीय
दिनांक: १२ जुलै २०२४
मुंबई गोवा महामार्गांवर इन्सुली उत्पादन शुल्क विभागाने १४ चाकी वाहनामधुन गोवा बनावटीची दारूची अवैध वाहतुकीवर कारवाई केली. या कारवाईत ५६ लाख १० हजार किमतीच्या दारूसह एकूण ८६ लाख १० हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तर या प्रकरण कृष्णा दिलीप गर्जे (वय २६, रा. कळंबोलि-रायगड) याला ताब्यात घेण्यात आले. ही शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मळगांव येथिल पुलाजवळ करण्यात आली. या कारवाईत चाैदा चाकी वाहन (एनएल ०१ ए एफ ४३०२) ची रुपये ३० लाख किंमतीचा समावेश आहे. या वाहनामध्ये गोवा बनावटीची विविध ब्रँन्टचे ६०० बाँक्स आढळून आले. आज शुक्रवारी दुपारी संशयिताला कोर्टासमोर हज़रत केले एक दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात
आली आहे.
ही कारवाई उत्पादन शुल्क अधिक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनखाली प्रभारी निरीक्षक प्रदीप रास्कर, दुय्यम पर्यवेक्षक तानाजी पाटिल, सहायक दुय्यम पर्यवेक्षक गोपाल राणे, युवा दीपक वायदंडे, प्रसाद माळी, आर.एस.एस. शिंदे यांनी केली. अधिक तपास पी. एस. रास्कर करीत आहेत.
