
बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर
दिनांक: १२ जुलै २०२४
निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहन धारकांना नाहक त्रास.
वाहन धारक जीव मुठीत धरून करत आहेत प्रवास.
गत वर्षी प्रमाणे यंदाही निकृष्ट दर्जाच्या कामामुळेवाफोली येथील नळ योजना विहिरी जवळील फुलावर दोन्ही बाजूला खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.वाहन धारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भले मोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. वाहन धारक संबंधित विभागाच्या व ठेकेदाराच्या विरोधात नाराजी व्यक्त करत आहेत.वर्षा पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक याच राज्य मार्गाचा अवलंब करत असतात.संबंधित विभागाने तत्काळ सदर रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अन्यथा
भविष्यात या ठिकाणी अपघात घडून कोणतीही जीवितहानी झाल्यास संबंधित विभाग सर्वस्वी जबाबदार राहील असे स्थानिक वाहन धारक व ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
