एस.एस.सी.१९८८ बेंच च्या माजी विद्यार्थ्यांकडून प्रशालेला बेंच भेट- १२ बेंच देऊन केले आश्वासन पूर्ण .यापुढेही असेच सहकार्य करणार असल्याचे दिले आश्वासन.
विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगांव प्रशालेचे एस.एस.सी.१९८८ बॅच कडून २४ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या स्नेह मेळाव्यात प्रशालेला बेंच देण्याचं आश्वासन दिले होते त्याची आज या माजी विद्यार्थ्यांनी बारा बेंच देऊन पुर्तता केली तसेच यापुढेही आपण शाळेच्या प्रगतीसाठी या प्रशालेला मदत करणार असल्याचे सांगितले.
श्री गुरुनाथ नातु, श्री दत्तप्रसाद प्रभू ,श्री विवेक पांढरे, श्री.उदय पांढरे, श्री.अविनाश जोशी या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.
या योगदानाबद्दल शाळा समिती अध्यक्ष श्री अण्णा झांट्ये ,प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.उत्तम भागीत, शिक्षिका काव्या साळवी, मानसी परूळेकर तसेच पालक विद्यार्थ्यांनी या माजी विद्यार्थ्यांचे मानले आभार .