आताच शेअर करा

दिनांक: ०२/०६/२०२६

बांदा :  मुसळधार पावसात वाढलेल्या वाऱ्यासह  शेर्ले येथील रवळनाथ मंदिराचा समोरचा दर्शनी भाग आज गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कोसळला.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मंदिराच्या जुन्या बांधकामाला धोका निर्माण झाला होता. आज दुपारी पावसाचा जोर वाढल्याने मंदिराचा दर्शनी भाग अचानक कोसळला. सुदैवाने यावेळी मंदिरात कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मंदिर परिसराची पाहणी करण्यात आली असून पुढील धोका टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

फोटो : शेर्ले येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा दर्शनी भाग कोसळल्याने कौले आणि लाकडी वासे विखुरलेले दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed