आताच शेअर करा

दिनांक: ०५/०७/२०२६

बांदा: दिनांक:०२ जुलै रोजी भाजप पक्षाचे युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून मडूरा गावात जिल्हापरिषद प्राथमिक शाळा आणि गावातील अंगणवाडी यांना  दप्तर व वही वाटप चा कार्यक्रम घेण्यात आला.

मडूरा गावाचे मनमिळावू आणि समाजसेवी नेतृत्व भाजपचे युवा कार्यकर्ता प्रवीण उर्फ पिंट्या परब यांच्या हस्ते दप्तर आणि वह्या वाटप करण्यात आले. प्रवीण परब हे समाजकार्यात वेळोवेळी अग्रेसर असतात पक्षाच्या माध्यमातून आपली भूमिका बजावत असतात. या वर्षी त्यांनी शाळेत दप्तर वाटपाचा कार्यक्रम हातात घेतला. समाजातील सहकार्याची भावना लक्षात घेऊन गावातील प्रत्येक मुलाला दप्तर भेटावे. म्हणून भाजप युवा नेतृत्व विशाल परब यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवला. यावेळी त्यांच्या समवेत शाळा नंबर १चे शिक्षक श्री. बरागडे आणि विद्यार्थी, शाळा नंबर २ चे शिक्षक आणि विद्यार्थी सौ. सुषमा पोपकर, आणि विद्यार्थी.शाळा नंबर ३ चे शिक्षक सौ. कोलते मॅडमआणि विद्यार्थी परब वाडी बालवाडी श्रीमती- उज्वला परब, देऊळवाडी बालवाडी पल्लवी परब, बाबरवाडी बालवाडी श्रमती पल्लवी गवंडी आणि विद्यार्थी व स्थानिक प्रतिनिधी श्री. श्रीराम जाधव, अथर्व जाधव, पंकज जाधव, निलेश जाधव, श्रुती जाधव आणि आंतोन डिसोजा उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *