आताच शेअर करा

दिनांक: २६/०५/२०२६

दोडामार्ग:वानोशि कुडासे (आमेतार) येथे पर्यटनासाठी आलेल्या १३ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.सचिन सांगेलकर असे मृत मुलाचे नाव आहे.हा मुलगा मुंबईतून आपल्या शालेय सुट्टीत कोकणात आला होता.  असुरक्षित पर्यटनामुळे मृत्यू झाल्याचे समजते. प्रशासनाचा  दुर्लक्ष झाल्यामुळे हा बळी गेलेला आहे. मुंबईहून कोकणात सुट्टीच्या दिवसात मज्जा लुटण्यासाठी आलेला सचिनला  अखेरचा स्वास कोकणाच्या नदीपात्रात घ्यावा लागला. असे कित्तेक पर्यटक कोकणात आपल्या सुट्या घालवण्यासाठी येत असतात पण कोकणात पर्यटन तर आहे. पण पर्यटनाचा धोका ही  आहे.हे प्रशासनाला कधी समजलच नाही. त्यामुळे आनंदाने आपल्या सुट्टया घालवण्यासाठी कोकणाकडे आलेल्या पर्यटकांना आपला जीव गमवावा  लागतो. असे मृत्यू होत असताना प्रशासनाला जाग कधी येणार असा सवाल आज  पर्यटक आणि कोकणवासीयाच्या मनात उद्भवत आहे. संबंधित प्रशासनाने आता तरी पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी ठोस पावले उचलली गेली पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed