आताच शेअर करा

दिनांक: ०७/०७/२०२६

सावंतवाडी: महावितरणच्या हलगर्जी पणामुळे आज मडूरा पंचक्रोशीत विजेचा लपंडाव चालू आहे. असा  धडधडीत आरोप सातार्डा पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ते यांनी आरोप केला आहे.
गेली कित्येक दिवस या पंचक्रोशीत वीज सुरळीत   वीज धारकांना भेटत नाही. विज येत पण काही क्षणार्धात निघून जाते. त्यामुळे घरगुती विजेवर चालणाऱ्या उपकरणांमध्ये बिघाड आलेला आहे.अशी तक्रार ग्राहकांनी केली आहे.पंधरा वीस हजारांची उपकरण घ्यायची आणि महावितरणच्या निष्काळजी पणामुळे बिघवडायची अशी सध्याची परिस्थिती आहे.गेली दोन दिवस मडूरा गावात वीजच नाही. याच खरं कारण काय असेल तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा आहे. मे महिन्यामध्ये विद्युत तारावरील झाडे झुडपे यांची छाटणी होणे आवश्यक होती. पण ती केली गेली नाही. त्यामुळे आज वीजवाहक तारावर झाडे पडूनतारा तुटून जात आहेत. त्यामुळे तुटून पडलेल्या झाडांचे कारण दाखवून महावितरण आज वीज ग्राहकांना फसवण्याचे काम करत आहे. योग्यवेळी झाडाझुडपाची छाटणी झाली असती तर ही आज गावावर वेळ आली नसती. त्यामुळे महावितरण याला सर्वस्वी जबदार आहे . असे आरोप श्री. पारिपत्ते  यांनी  केले आहे.महावितरणने वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करणे ही त्यांची जबाबदारी आहे. ती जबाबदारी जर महावितरण नाकारत असेल तर विज ग्राहकांना घेऊन वीज कार्यालयावर मोर्चा आणावा लागेल. त्यामुळे जी कामे विजे संबंधित असतील ती कामे लवकरात लवकर पूर्ण करावी व ग्राहकांना वीज सुरळीत करून द्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed