
दिनांक: ०८/०७/२०२६
बांदा: गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रज्ञा परीक्षेत मोरगाव नं.१ शाळेच्या तीन विद्यार्थ्यांना राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असून यामध्ये इयत्ता पहिलीतील दुर्वा निश्चल ठाकूर राज्यात पाचवी, इयत्ता दुसरीतील तनिष्का तुषार गोरड राज्यात चौथी व आयांश रूपेश कदम जिल्ह्यात सहावा आला आहे .या विद्यार्थ्यांना मराठा भवन कुडाळ येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात कुडाळ पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक,पिंगुळी जिल्हा परिषद सदस्य गुरूनाथ सडवलेकर, गुरूकुल एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष किरण चौगुले आदि मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.या यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका स्वाती पाटील यांचे मार्गदर्शन लाभले,या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका भाग्यश्री कुबल, सहकारी शिक्षक ज्ञानेश्वर सावंत,संतोष गवस, शाळा व्यवस्थापन समिती यांनी अभिनंदन करण्यात आले असून पालक व ग्रामस्थांकडून या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
