
दिनांक: ०७/०७/२०२६
बांदा: काजू बोर्ड डायरेक्टर व जागतिक अर्थतज्ञ चंदगडचे सुपुत्र डॉक्टर परशराम पाटील यांनी आपली सर्व ताकद लावून हलकर्णी एमआयडीसी मध्ये अखेर 36 एकर जमीन काजूच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी शासनास देण्यास भाग पाडले याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन ! …मध्यंतरी हा प्रोजेक्ट पालघर येथे जाण्याची वर्तमानपत्रातून बातमी आली होती त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्यकर्त्यांची किंव आली होती .मात्र पालघर येथे पाचशे किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावर होणाऱ्या काजू प्रोजेक्ट ऐवजी सिंधुदुर्ग पासून 70 – 80 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हलकर्णी येथे संपर्क साधणे शक्य होईल व शेतकऱ्यांनाही सुखावह होईल यामुळे काजू शेतकऱ्यांना आपली मानसिकता बदलावी लागत आहे . कोल्हापूर मधील आजरा चंदगड व गडहिंग्लज या तालुक्यात काजूच्या पिकाचे क्षेत्र वाढत आहे .परंतु आज कोल्हापूर मध्ये अकरा ते बारा हजार हेक्टर काजू क्षेत्र असूनही व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे एक लाख हेक्टर काजू क्षेत्र असून जीआय मानांकित सिंधुदुर्ग जिल्ह्याला ठेंगा हे सिंधुदुर्गातील राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाचं उदाहरण आहे . . .हलकर्णी येथील 36 एकर जमिनीमध्ये काजू मंडळाचे चंदगड उपविभागीय कार्यालय -सेंटर ऑफ एक्सलन्स -काजू करीता विशेष वस्तू बाजार ( स्पेशल कमोडिटी मार्केट )प्रक्रिया केंद्रे व गोदामे उभारण्यात येणार आहे .दिनांक 30 जून 2026 रोजी या संदर्भातील शासन निर्णय जारी झाला . हलकर्णी एमआयडीसीतील एक लाख 47 हजार 620 चौरस मीटर भूखंड महाराष्ट्र राज्य काजू मंडळाला खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली असून तिला जिरायत दर ठेवून 58 कोटी 78 लाख 96 हजार 930 रुपये मोबदला मंजूर करण्यात आला आहे . . .सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी वारंवार मागणी करून नवी मुंबई वाशी मार्केट या सिमेंटच्या जंगलातील मुख्यालय वेंगुर्ला येथे आणण्यात यश मिळवलं -यामध्ये आमदार दीपक केसरकर सह डॉक्टर परशराम पाटील यांचेही योगदान आहे .मात्र हलकर्णी येथे ड्रीम प्रोजेक्ट झाल्यानंतर आपलं वेंगुर्ला येथील मुख्यालय हलकर्णी ला जाण्याची दाट शक्यता दिसते .आपले नेते मीटिंग व पेपर प्रसिद्धी पलीकडे काही करताना दिसत नाहीत .एक काजू बोट डायरेक्टर ही किमया करू शकतो पण जिल्ह्यातील नेते मात्र राजकारणात मशगुल आहेत .आपण सर्व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी या वेळी जागृत होऊन यावर लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधणे आवश्यक आहे .
