
दिनांक: २५/०५/२०२६
संपादकीय: ब्रिटिशांनी आपल्या सोयीसाठी आणलेला काजू आज कोकणाची शान आहे.याच काजूची प्रगतशील कलमे करून सिंधुदुर्ग त्यातून आज भरघोस असे उत्पन्न घेत आहे.आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला महत्त्वाचे स्थान या काजूने मिळवून दिले आहे.खास करून सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील महत्वाच्या उत्पन्नाचा स्त्रोत आहे.याठिकाणी चांगल्याप्रतीचा काजू होतो कारण ही तसेच आहे. चांगले पोषक वातावरण , जमिनीची सुपीकता आणि शेतकऱ्याची मेहनत या त्रिवाणी संघमाची जोड घालून काजू पिकवला जातो. या भूमी मध्ये असलेले पोटॅशियम, नायट्रोजन, सोडियम या सारखी पोषक द्रव्य असल्याने जगात या काजुला मान सन्मान आहे.अशा या काजुला जगात मानाचा मुजरा ठोकला जातो. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे या काजुला मिळालेले जी आय मानांकन हाच काजू परदेशात जाऊन आज सिंधुदुर्गचे नाव उच्च स्थरावर ठेवत आहे. आंबा ,काजू सारख्या फळांनी आज कोकणाला जागतिक स्तरावर नाव मिळून दिलेले आहे. मग माझा प्रश्न असा आहे. याचं काजुला या जमिनीत स्थान मिळू नये का ?नक्की आम्ही कमी पडतोय कुठे ? याचा विचार शेतकऱ्यांनी , लोक प्रतिनिधींनी आणि शासकीय यंत्रणेने करणे गरजेचे आहे. कारण चंदगड -कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य काजू मंडळातर्फे विभागीय कार्यालय -काजू प्रक्रिया प्रकल्प -गोदाम -सेंटर ऑफ एक्सलन्स युनिट -अत्याधुनिक नर्सरी -काजू निर्यात केंद्र आणि काजू करीता विशेष बाजार उभारणीसाठी ४० एकर जागा हलकर्णी एमआयडीसीत मंजूर झाली .याचं सर्व श्रेय काजू बोर्डाचे डायरेक्टर डॉक्टर परशुराम पाटील यांच्या विशेष प्रयत्नाला आहे आणि हे अभिनंदनिय असून याबाबत त्यांचे कौतुक करणे ही आवश्यक आहे .सिंधुदुर्ग फळ बागायतदार व शेतकरी संघटनेतर्फे या गोष्टीचे मनापासून स्वागत केले गेले आहे. कारण हे सर्व होणं गरजेचं होतं . . . .मात्र याबाबतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेतृत्व कमी पडत असल्याचे जाणवत आहे .जी आय मानांकित काजूचा बेल्ट ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे विशेषतः सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात सरस जीआय मानांकित काजू उत्पादन घेतलं जातं त्या ठिकाणी या सर्व सुविधा उपलब्ध होणं गरजेचं होतं .कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ७८ हजार हेक्टर हून अधिक क्षेत्रात काजू उत्पादन आहे .दोडामार्ग मधील आडाळी एमआयडीसीत यासाठी जागा उपलब्ध झाली असती शिवाय -मोपा एअरपोर्ट लगतच गोवा व कर्नाटक राज्य असल्याने सर्व बाबतीत आडाळी एमआयडीसी ही उपयुक्त होती . . .मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुवर्णसंधी असूनही राजकीय नेतृत्व व त्यांचे सहकारी यांच्याकडे विशाल दृष्टिकोन नसल्याने भविष्यातही जिल्ह्यातील काजू उत्पादन प्रचंड वाढ होत असूनही भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा केंद्रस्थानी असणे आवश्यक होते .संपूर्ण सिंधूदर्ग जिल्ह्याचा विभाजन करणारा राष्ट्रीय महामार्ग ६६ हा ही सिंधुदुर्ग मधून गोव्या राज्यात जातो .भारतभरातून दिवसाला शेकडो गाड्या गोवा राज्यामध्ये व सिंधुदुर्ग मध्ये पर्यटनासाठी येतात याचाही फायदा काजू उद्योगाला झाला असता .आपल्या जिल्ह्याचे काजू संचालक श्री मनीष दळवी यांनी याबाबत आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करून जिल्ह्याला काजू वैभव प्राप्त करून देण्याची गरज आहे.परदेशातूनही आयात केलेला काजू हा गोव्याच्या पोर्ट वरून आणला जातो गोव्यातही या काजुला चांगली मागणी आहे. तिथेही आज काजूचा चांगला व्यापार होत आहे.मग एवढा मोठा सिंधुदुर्ग असताना ही गोदामे, ही विभागीय कार्यालये, प्रगतशील नर्सरी हे सगळे कोल्हापुर जिह्यात का? काजू हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उदयास येणारे पिक बाजारपेठे म्हणून कोल्हापुरात जावे लागणार का ? ही सर्व खेळी शासनाची आहे की राजकारण्याची हे ही तपासणे गरजेचे आहे. कोल्हापूर बद्दल आमचा द्वेष नाही पण ज्या ठिकाणी उत्पन्न तयार होते त्याची बाजारपेठ त्याच ठिकाणी असावी असे शासनाचे धोरण आहे. कोल्हापुरातील पिकवलेल्या पिकांची बाजारपेट सिंधू नगरीत तयार केली तर चालले का? नाही चालणार ना !मग सिद्धुनगरीत काजू उत्पन्नाची बाजारपेठ का नाही होणार? सिंधुर्गातील सरकारला व्यापाऱ्यांचे नुकसान होईल असे वाटते का? सिंधुदुर्गात बाजारपेठ असल्यास एक संघटित काजुला दर राहील.आपला काजू शेतकरी त्या बाजारपेठेत जाऊन विकले. मोठी नर्सरी प्रस्थापित झाल्यास वेगुर्ला फळ संशोधन केंद्राची मोठी मदत मिळेल.काजू लागवडीत वृद्धी होईल. काजू हा सिंधुर्गाचा महत्वाचा पेटंट बनेल सिंधुर्गला अजून मोठे स्थान मिळेल या सर्व गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे..काजू बाजारपेठे ही सिंधुदुर्गात झाली पाहिजे काजूचे दळण वळण हे व्यापार हा सिंधुदुर्ग नगरीचा हक्क आहे तो हिसकावून घेतला जाऊन नये आणि शेतकरी आपल्या योग्यत्या शेतीमालापासून वंचित राहू नये हिच इच्छा!
लेखन
संपादक
यश माधव
कोकण व्हिजन न्यूज.
