आताच शेअर करा

दिनांक: २४/०५/२०२६

शिरोडा: रेडी बंदर हद्दीत आज पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास शिरोडा खालची केरवाडी येथील “श्री देवी पावणाई” ही बिगरयांत्रिकी मासेमारी बोट बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली.

या बोटीवर बोट मालक प्रकाश राघोबा सारंग, दाजी प्रकाश सारंग आणि राजन राघोबा सारंग असे तीन खलाशी होते. यापैकी प्रकाश राघोबा सारंग आणि दाजी प्रकाश सारंग यांनी दुसऱ्या बोटीच्या मदतीने सुरक्षितपणे किनारा गाठला असून राजन राघोबा सारंग हे बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी जिल्हा प्रशासन व संबंधित यंत्रणांकडून युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू आहे.

या घटनेची मी सातत्याने माहिती घेत असून संबंधित यंत्रणांच्या संपर्कात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *