
सिंधुदुर्ग : संपादकीय
दिनांक: ८ जुलै २०२४
काल सिंधुदुर्गातील काही ठिकाणी अतिवृष्टी झाली.अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे मडूरा दशक्रोशीतील मडुरा आणि रोणापाल ह्या दोन्ही गावाच्या मंदिरामध्ये अचानक पाणी घुसले. दिनांक: ७ जुलै च्या पहाटे पासूनच पावसाच्या सरी अधुन मधुन बरसत होत्या पण सकाळी ९:३० दरम्याने ह्या पावसाने जोर धरला आणि अवघ्या काही तासातच हाहाकार माजला. पावसाने नदी नाले ओतंबून वाहायला लागले आणि दोन्ही मंदिराच्या बाजूने वाहणाऱ्या वहाळाने ( छोट्या नदीने ) रौद्र रूप धारण करून नदी पत्रातून पाणी बाहेर आले आणि मंदीरात घुसले. सर्व परिसर जलमय झाला. तसेच आजूबाजूच्या घरा मध्ये पाणी घुसले. मडूरा मंदिराच्या बाजूला आसलेल्या बंटी परब यांच्या घरात आणि दुकानात व बाबू शेट्ये यांच्या केस कर्तनालयात पाणी घुसले. बरचसे नुकसान झाले आहे. तसेच रोणापाल येथील मंदिराच्या बाजूला असलेली घरे ही पाण्याच्या चपाट्यात आली आहेत.रोणापाल येथील आंब्याचे गाळू या ठिकाणी खडपकर देवस्थानाच्या समोरील रस्ता पूर्ण वाहून गेला असून काही दिवसापूर्वीच त्याचे डांबरीकरण झाले होते. संबंधित विभागाने लवकरात लवकर या रस्त्याची डागडुजी करून पुन्हा सुरळीत रस्ता मिळावा यासाठी तेथील ग्रामस्थांनी विभागाला विनंती केली आहे.

जाहिरात
