आताच शेअर करा

दिनांक: ०४/०४/२०२६

सावंतवाडी: निरवडे ग्रामस्थांच्या सहकार्याने श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळांने आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य अशा “निरवडे महोत्सव २०२६” चे आज निरवडे येथे जल्लोषी वातावरणात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते श्री विशालजी परब यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला श्री विशाल परब यांच्या समवेत सावंतवाडी नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिलजी निरवडेकर, सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती श्रीमती सुष्मिता जाधव, तळवडे मतदार संघातील जिल्हा परिषदेचे सदस्य श्री संदीपजी गावडे, सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती श्री गौरव मुळीक यांच्या सोबतच कणकवली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री संदेश पारकर हे देखील उपस्थित राहिल्याने एक राजकीय वेगळीच रंगतही या कार्यक्रमाला लाभली. या विशाल कार्यक्रमातून आमच्या निरवडे गावचा कला संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी राजकीय शक्तीची सकारात्मक साथ नेहमीच लाभणार असल्याचा संदेश यानिमित्ताने सावंतवाडी वासियांसमोर गेल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

या दणकेबाज कार्यक्रमाचे आयोजन समस्त निरवडे ग्रामस्थ आणि श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळ माळकरवाडी यांच्यावतीने अत्यंत सुनियोजित पद्धतीने करण्यात आले होते. त्यांच्या नियोजनाचे ही सर्वत्र कौतुक होत आहे. या महोत्सवासाठी केतन आजगावकर ( भाजपा सोशल मीडिया प्रमुख सावंतवाडी ),
महेंद्र गावडे (तंटामुक्ती अध्यक्ष), दादा परब ( ग्रा. सदस्य तळवडे ) निखिल माळकर ( अध्यक्ष ), सुनिल माळकर ( उपाध्यक्ष ) , अर्जुन पोपकर ( सचिव) , चंदन गोसावी सर  ,  तिवरेकर सर ( मार्गदर्शक ) , विशाल पोपकर ( खजिनदार ) , सदस्य – चेतन माळकर, सचिन माळकर, नितेश माळकर, विराज पोपकर, संजय माळकर, राजाराम माळकर , किशोर माळकर आधी मान्यवरांची उपस्थिती देखील लाभली होती. चटकदार फूड फेस्टिवल आणि सांस्कृतिक रंगतदार कार्यक्रमांची मेजवानी हे या महोत्सवाचे खास आकर्षण ठरले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed