
दिनांक: ०५/०४/२०२६
सावंतवाडी: भाजपाचा वर्धापन दिन कार्यकर्त्यांपासून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्वांसाठी अत्यंत आनंद आणि अभिमानाचा विषय आहे. जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस ६ एप्रिल रोजी आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून करोडो कार्यकर्ते दरवर्षी पक्षाचा स्थापना दिवस उत्साहाने साजरा करतात आणि ‘सेवा भाव’ व ‘राष्ट्र प्रथम’ हा मूलमंत्र स्वीकारून कार्य करण्याचा संकल्प करतात. या स्थापना दिनानिमित्त प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या संकल्पनेप्रमाणे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावर भाजपाचा ध्वज फडकणार आहे.
पक्षाची ध्येयनिष्ठ विचारधारा, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण अशा आमच्या सर्व नेत्यांची जनतेशी असलेली नाळ, त्यांच्या कार्याची लोकप्रियता, भाजपा सरकारची राज्य आणि केंद्रातील यशस्वी ध्येयधोरणे आणि पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांचा त्याग व परिश्रम यांचे देशातील जनता कौतुक करत आहे. समाजाच्या सर्व स्तरातून पक्षाला अपार जनसमर्थन मिळत असून पक्षाचा विस्तार सातत्याने होत आहे.
देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदीजींनी गेल्या वर्षी स्थापना दिनानिमित्त आपल्या संबोधनात म्हटले होते की, “भाजप ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या मंत्राने काम करत आहे. आपले समर्पण भारत मातेला आहे, आपले समर्पण देशातील कोटी-कोटी जनतेला आहे, आपले समर्पण देशाच्या संविधानाला आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त देशाच्या संविधानाचे महत्त्व भाजपाच्या माध्यमातून जनतेपर्यंत विविध कार्यक्रमातून पोहोचवले जाणार आहे. १४ एप्रिल रोजी संविधान वाचनाचा कार्यक्रम भाजपा संपर्क कार्यालयात घेण्यात येणार आहे. आज भाजप म्हणजे विकासाचा पर्याय, विश्वासाचा पर्याय, नवीन विचारांचा पर्याय आणि देशाच्या विजयाचा पर्याय आहे. भाजपची कार्यशैली सर्वसमावेशक, सर्वस्पर्शी आणि सर्वांचे हित करणारी आहे. भारतीय जनता पार्टी हा केवळ एक पक्ष नसून एक विचार आहे, ज्याचे ध्येय राष्ट्रनिर्मिती आणि जनकल्याण आहे. भाजप म्हणजे – मिशन, भाजप म्हणजे – समाजसेवा, भाजप म्हणजे – समाजाचे सक्षमीकरण, भाजप म्हणजे – नव्या भारताची सांस्कृतिक जडणघडण आहे. भाजपाच्या नावलौकिकाला साजेशे कार्यक्रम भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी या कालावधीत करणार आहेत.
माननीय राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नितीन नवीनजी यांच्या निर्देशानुसार, पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त खालील कार्यक्रम करण्यात येणार आहेत.
पक्षाचा स्थापना दिवस — ६ एप्रिल:
• सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या सावंतवाडी येथील भाजपा संपर्क कार्यालय तसेच सर्व मंडल कार्यालयांची वरील कालावधी सजावट करण्यात येणार आहे.
• ६ एप्रिल रोजी पक्षाच्या संपर्क तसेच मंडल कार्यालयांवर पक्षाचा ध्वज सन्मानपूर्वक फडकवण्यात येईल. या दिनाचे औचित्य साधून नागरिकांसाठी मिठाई वाटप तसेच रुग्णांसाठी फळवाटप कार्यक्रम करण्यात येणार आहे.
• सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या घरावर पक्षाचा ध्वज फडकवावा आणि सेल्फी घेऊन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध करावा असे आवाहन श्री विशाल परब यांनी मीडियाच्या माध्यमातून केले आहे.
• ६ एप्रिल रोजी प्रत्येक बूथवर प्राथमिक आणि सक्रिय सदस्यांनी एकत्र येऊन पक्षाचा स्थापना दिवस साजरा करावा, अशा पद्धतीच्या सूचना पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना व बूथ अध्यक्षांना देण्यात आल्या आहेत. शक्ती केंद्रांवर सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर पक्षाच्या ध्येय धोरणांचे वाचन करण्यात येणार आहे.
* सावंतवाडी मतदार संघातील महापुरुषांना अभिवादन करण्यात येणार आहे. सावंतवाडी राजवाडा परिसर तसेच मतदार संघातील प्रमुख चौकांमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच अन्य महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन रॅली काढण्यात येणार आहे. भाजपा स्थापना दिवस ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यादरम्यान असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
* संविधान वाचनाचा कार्यक्रम शक्ती केंद्र आणि भाजपाच्या बूथच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार आहेत
* विविध सामाजिक
उपक्रमातून भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस साजरा करण्यात येईल. आरोग्य शिबिरे, सध्या कोकणात असलेल्या उन्हाच्या कडाक्याचा विचार करता ठिकठिकाणी लोकांच्या सुविधेसाठी पाणपोई सुरू करण्यात येतील.
* सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळे, हॉस्पिटल परिसर, वेंगुर्ला येथील समुद्रकिनारे, सावंतवाडीतील मोती तलावाचा परिसर स्वच्छ करण्यासाठी यादरम्यान स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.
* भारतीय जनता पार्टीच्या सुरुवातीच्या काळातील वाटचालीत खंबीर साथ देणाऱ्या जेष्ठ कार्यकर्त्यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा सावंतवाडी येथील भाजपा संपर्क कार्यालयात संपन्न होईल. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी या जेष्ठ कार्यकर्त्यांच्या घरी जाऊनही त्यांचा सन्मान करण्यात येईल. जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांमध्ये संवाद व समन्वय साधत भविष्यात पक्षाची मजबूत बांधणी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
• विविध कला आणि क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम यावेळी घेण्यात येणार आहेत. दशावतार कला, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी उपक्रमातून भाजपाचा स्थापना दिवस साजरा करण्यात येणार आहे
* सावंतवाडी भाजपा संपर्क कार्यालयात ” मी भाजपाचा- भाजपा माझा, निर्धार सेवा आणि समर्पणाचा” ” भाजपा म्हणजे विकासाचा पर्याय… भाजपा हा विश्वासाचा पर्याय.. भाजपा नवीन विचारांचा पर्याय आणि देशाच्या विजयासाठी भाजपा हाच पर्याय” या थीमवर आधारित सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार आहेत.
* या विविध कार्यक्रमांचे नियोजित वेळापत्रक उद्या भाजपा संपर्क कार्यालयातून प्रसिद्धीसाठी प्रसारित करण्यात येणार आहे. सर्व पत्रकार मित्रांना विनंती आहे की जनसेवेच्या या मिशनच्या यशस्वीततेसाठी या सर्व कार्यक्रमांना योग्य ती प्रसिद्धी आपणाकडून देण्यात यावी. भाजपा स्थापना दिनानिमित्त आपणाकडूनही अशा सक्रिय शुभेच्छा अपेक्षित आहेत.
