आताच शेअर करा

दिनांक: २८/०३/२०२६

सावंतवाडी: सावंतवाडी रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या सिल्वर एकर या इमारती मध्ये तळ मजल्यावर खाली बंद घराच्या बाजूला एका चार फूट लांबीच्या मगरीला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडले. सविस्तर माहिती स्थानिक लोककांकडून मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोचले.मोठ्या प्रयत्नानंतर ही मगर पकडण्यात वनविभागाला यश आले.या मगरी मुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.सावंतवाडी वनविभागाच्या जलद कृती दल चे नेतृत्व करणारे बबन रेडकर यांनी सापळा रचून मगर पकडली .तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed