
दिनांक: २७/०३/२०२६
बांदा: सिंधुदुर्ग जिल्हा हौशी व सावंतवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने दिनांक २८ व २९ मार्च रोजी पाटेश्वर मैदान बांदा येथे ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. खास करून ४५+ च्या स्पर्धकान साठी राबवण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यातील एक संघ अशा ह्या स्पर्धेचे स्वरूप असेल.
या स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हापरिषद अध्यक्ष प्रमोद कामत व सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल हळदिवे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
दिनांक २९ मार्च रोजी भाजप युवा नेते विशाल परब व सावंतवाडी उपनगराध्यक्ष ऍडव्होकेट अनिल निरवडेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास क्रिकेट प्रेमींनी आणि प्रेक्षकांनी उपस्थित रहावे असे आव्हान सिंधुदुर्ग जिल्हा हौशी व सावंतवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. याची क्रिकेट प्रेमींनी नोंद घ्यावी.
