आताच शेअर करा

दिनांक: १८/०२/२०२६

बांदा: छत्रपती  शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवा निमित्त मडूरा येथे छत्रपती  शिवप्रेमी व्हाट्सअप ग्रुप मडूरा आयोजित. रेकॉर्ड डान्स स्पर्धा  गोवा आणि महाराष्ट्रासाठी ठेवण्यात आलेली आहे.या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ५,५५५ आणि चषक व द्वितीय पारितोषिक ३,३३३ आणि चषक ठेवण्यात आले आहे.ही स्पर्धा श्री  देवी माऊली रंगमंच माऊली मंदिर मडूरा येथे होणार आहे. स्पर्धकांनी याचा लाभ घ्यावा. तसेच शिवजयंती निमीत्त सकाळी ९:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक त्यानंतर प्राण प्रतिष्ठापना, शिव  पूजा, दीप पूजा सायंकाळी: ६:०० वाजता महिला फुगडीचा कार्यक्रम, संध्याकाळी: ७:०० वाजता भव्य खुली रेकॉड डान्स स्पर्धा होणार आहे. या खास कार्यक्रमासाठी महाराष्ट्र आणि गोव्यातील नामांकित परीक्षक परीक्षण करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी पिंटो उर्फ प्रवीण परब यांच्याशी ९४०४७५९२१६  या भ्रमण ध्वनी वर संपर्क करून अधिक माहिती घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *