
दिनांक: २७ /०१/२०२६
सातार्डा: सातार्डा येथील सुशांत मेस्त्री यांनी काल २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सातार्डा घोगळवाडी येथील रस्ता अतिक्रमण विषयी पंचायत समिती सावंतवाडी कार्यालया समोर उपोषण छेडण्यात आले होते. या उपोषणास तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे.अधिकाऱ्यांनी समाधानकारक आश्वासन देऊन लिखित स्वरूपात शासकीय पत्र दिल्यामुळे हे उपोषण तात्पुरते थांबवण्यात आले आहे. अशी माहिती सुशांत मेस्त्री व पंकज मेस्त्री यांनी कोकण व्हिजन न्यूज ला संपर्क साधून दिली.
