
दिनांक: २४/०१/२०२६
बांदा: सातार्डा पंचायत समिती निवडणुकीच्या रणांगणात उडी ठोकून अपक्ष उमेदवार प्रवीण उर्फ पिंटो परब यांनी अर्ज दाखल केला आहे. पिंटो परब यांचे मुळातच युवा नेतृत्व प्रबळ असून युवा समुदाय त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे त्यांचे पारडे निवडणुकीच्या रणांगणात वजनदार दिसत आहे. विरोधकांचे भविष्यात धागे दणाणण्याची शक्यता दिसून येते .परब यांचा जनसमुदाय दांडगा असून गेली कित्येक वर्ष ते समाज सेवेचे काम करत आहेत. युवा नेतृत्व असल्याने लोकांची पसंती या नेतृत्वाला दिसून येत आहे. सातार्डा, सातोसे, मडूरा येथे त्यांची या मतदारसंघात मजबूत पकड आहे. जनमानसात, तळागाळात काम करण्याची त्यांची वृत्ती पाहून जनसमुदाय त्यांच्या पाठीशी उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे हे नाव पसंतीस आलेले आहे. यावेळी प्रवीण उर्फ पिंटू परब हे नक्कीच समोरच्या उमेदवारास टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. या मतदारसंघात अनेक कामे प्रलंबित असून त्याचा पाठपुरावा करण्याची ताकद पिंटू परब यांच्यात असल्याने भविष्यातील निवडणुकीमध्ये हे नक्कीच बाजी मारतील असे दिसून येत आहे.
