आताच शेअर करा

दिनांक: २३/०१/२०२६

बांदा:  सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळी तसेच लगतच्या गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी पर्यटक दाखल होत आहेत. पर्यटन स्थळांवर कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ (ड्रग्स) यांचा वापर व वाहतूक होऊ नये, यासाठी सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून सतर्कता वाढवण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर काल दिनांक २२ रोजी इन्सुली पोलीस तपासणी नाका येथे विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.

सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी करण्यात आली.

यावेळी बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदुर्ग आणि बिडीडीएस पथक सिंधुदुर्गचे अधिकारी उपस्थित होते. तपासणी नाक्यावर श्वान पथकाच्या मदतीने खासगी आराम बस तसेच इतर खासगी वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.

पर्यटकांच्या सुरक्षिततेसह पर्यटन स्थळांवरील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अशा तपासण्या पुढील काळातही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed