आताच शेअर करा

दिनांक: २३/०१/२६

सातार्डा: सातार्डा मुख्य रस्ता ते घोगळवाडी , हरिजन वाडी, काराखांडी रस्त्याच्या प्रवेशद्वारावर  एका गावातील व्यक्तीने  चिऱ्यांची भिंत घालून तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूस काजूची झाडे व नारळाची झाडे लावून रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे. मुळात हा रस्ता पी डब्ल्यू डी च्या मालकीचा असून व्ही आर ४०० या नावाने नोंद आहे. असे असताना त्यांनी या रस्त्यावर नियम न पाळता व  ग्रामपंचायतची परवानगी न घेता बेकायदेशीर विनापरवाना    इमारत बांधकाम केलेले आहे.  त्यामुळे रस्त्यावर अडचण निर्माण झालेली आहे.  ॲम्बुलन्स, बस सेवा तसेच बांधकाम साहित्य  आणण्यासाठी अडचण  निर्माण झाली आहे.या विषयाला गेली पंधरा वर्षे  झाली आहेत.  या    व्यक्तीचा जमिनीशी काहीही संबंध नसताना अतिक्रमण केले आहे.
गेले एक वर्ष मी सुशांत रामनाथ मेस्त्री या संबंधित बाबीचा अधिकाऱ्यांसमोर पाठपुरावा करत आहे. आता या व्यक्तीने  अतिक्रमण काढून टाकावे. अशा नोटिसा बांधकाम विभागाकडून पाठवण्यात आल्या आहेत. परंतु ही  व्यक्ती नोटिसा न घेता ते पुन्हा प्रशासनाला पाठवत आहेत. प्रशासनाच्या पाठवलेल्या नोटिसा  न जुमानता आता पर्यंत हे अतिक्रम जैसे थे आहे.  बांधकाम विभागाने या  व्यक्तीला  आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले होते ते त्यांनी अजूनही सादर केलेले नाही. जर त्यांनी म्हणणे सादर केले नाही तर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे असे प्रशासनाच्या पत्रात नमूद केलेले आहे. हे अतिक्रमण हटवण्यासाठी बांधकाम विभाग , बी. डि. ओ. ग्रामपंचायत, पोलीस सीईओ, जिल्हा परिषद जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.  सदरचे अतिक्रमण हटवून वाहतुकीस रस्ता मोकळा न केल्यास येत्या २६ जानेवारी  रोजी मी स्वतः सुशांत  मेस्त्री, पंकज मनोहर मेस्त्री व गावातील सर्व ग्रामस्थ यांना सोबत घेऊन रस्ता  खुला होई पर्यंत सावंतवाडी बांधकाम विभाग कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे. याची दखल सर्व संबंधित अधिकारी यांनी घ्यावी. व त्याआधी अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्यात यावा. अशीही मी संबंधितांना विनंती करत आहे. सदरचा विषय हा साईप्रसाद कल्याणकर चार्टर्ड अकाउंटंट समाजसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली वरील समस्येचा पाठपुरावा करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed