
दिनांक: ९ /१/२०२६
सावंतवाडी: शनिवार दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी सरमळे (नांगरतासवाडी )येथे श्री देव राम रक्षक देवतेचा जत्रा उत्सव साजरा
होणार असून सकाळी नेहमीप्रमाणे देवतेची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा पाठ केला जाईल. त्यानंतर भाविकांना दर्शनास मंदिरात प्रवेश दिला जाईल. दिवसभरात नारळ केळी ठेऊन नवस बोलणे, फेडणे असा कार्यक्रम असतो. त्यामुळे गावात रामरक्षक देवतेला वेगळे स्थान आहे . नवसाला पावणारा आणि भक्तांच्या हाकेला धावणारा अशी या देवतेची ख्याती किर्ती आहे. गोवाराज्यातून व कोकणातील भक्त मंडळीया जत्रोत्सवात दर्शनास येत असतात. रात्री चेदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण यांचा खास नवीन वर्षातील नाविन्यपूर्ण ट्रिक्सिन युक्त नाट्यप्रयोग “वेंकट रमणा जय गोविंदा” विविध ट्रेक्सिन कलाकृतीने भरलेला नाट्य प्रयोग साजरा होणार आहे. सर्व भाविकांनी या नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटी व ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
