दिनांक: ८/१/२०२६
सातार्डा: महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांना जोडणारा हा नईबाग सातार्डा महत्त्वाचा पुल आहे. पुलासाठी रुः ५ कोटी पुलाची दुरुस्तीसाठी मंजूर झाले आहेत. कोकण व्हिजन न्यूज चैनल च्या चित्रफित माध्यमातून पाठपुराव्यानंतर हा निधी मंजूर झाला आहे. परंतु या पुलावरून महाराष्ट्रातील पुरुष व स्त्रिया मोठ्या प्रमाणात नोकरी, कॉलेज, व्यवसाय तसेच आपल्या वैयक्तिक कामासाठी याच पुलाचा वापर करून ये जा करत असतात. तसेच गोव्यातून किंवा महाराष्ट्रातून ये जा करण्यासाठी हा महत्त्वाचा फुल असून रात्री अपरात्री येथे मोठ्या प्रमाणात रहदारी चालू असते. आज पर्यंत या पुलावर बऱ्याचशा जीव घेण्या घटना घडल्या आहेत. याच पुलावरून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढलेले आहे.त्यामुळे या पुलावर सीसीटीव्ही बसवणे व स्ट्रीट लाईट लावणे हे खूप गरजेचे वाटत आहे. रात्रीच्या वेळेस काळोखाचा फायदा उठवून पुलावर मुलींची छेडछाड काढणे, बलात्कार व परिसरातील गावांमध्ये चोऱ्या होण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. बेकायदेशीर होणारी अवजड वाहनाची वाहतूक तपासण्यासाठी तेथील पोलिस अधिकाऱ्यांना खूप त्रास होत आहे. या सर्व बाबींचा विचार करता पुलावर स्ट्रीटलाईट व सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाने या गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर या दोन्ही सुविधा अंमलात आणाव्यात अशी मागणी सातार्डा गावचे सामाजिक कार्यकर्ते नितीन कळंगुटकर यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ओरस सिंधुदुर्ग येथे मागणी केली आहे.

