आताच शेअर करा
फोटो: विनीत गवस

दिनांक: १९ डिसेंबर २०२५

बांदा: वाफोली विलवडे या परिसरातील असणाऱ्या क्वारी आणि क्रशर च्या विरोधात रविवार दि २१/१२/२५ रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता वाफोली ग्रामस्थ्यांची येथील समाजिक कार्यकर्ते श्री गुणेश गवस यांच्या निवांस्थानी क्वारी क्रेशर च्या विरोधात तातडीची बैठकिचे आयोजित करण्यात आली आहे.
       वाफोली विलवडे या ठिकाणी असणाऱ्या क्वारीमध्ये जे मोठ्याप्रमाणात ब्लास्टिंग होते. त्यामुळे वाफोली गावातील अनेक घरांच्या भितींना तडे गेले आहेत यामुळे घरांना मोठा धोखा निर्माण झाला आहे. वाफोली गावाला तिथल्या बाग बगयतील वाफोली धरणातून पाण्याचा पुरवठा होतो मात्र सतत जोरदार होणाऱ्या ब्लास्टिंग मुळे वाफोली धरणाला तडे पडत आहेत. याकडे वेळीच लक्ष ना दिल्यास भविष्यात ते धरण १००% फुटणार यात शंकाच नाही आणि जर हे घडलं तर येथील ग्रामस्थानी कष्टाने उभ्या केलेल्या बाग बागायती ही संपुष्टात यायला वेळ लागणार नाही.
       दिवस रात्र सुरु असणारे क्रेशर मुळे वायू प्रदूषित होत आहे सतत धुळीच साम्राज्य सर्वत्र पसारात आहे या मुळे या प्रदूषणाच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वाशनाचे त्रास हे निश्चिचत सामोरे जावे लागेल.
      या काळ्या दगडाची वाहतूक देखी वाफोली गावातुन मोठ्याप्रमाणात होते. हे डंपर ओव्हरलोड भरले जातात शिवाय ते रस्त्यातून भरधाव वेगाने धावत असतात शिवाय या डम्परांचे ड्राइवर वेगात  गाडी चालवत असताना मोबाईल वर बोलत असतात. यामुळे मोठा अपघात होऊ शकतो या पूर्वी झालेले आहेत.
      या सर्व गलथान कारभाराला आळा बसवण्यासाठी आज वाफोली गावातील ग्रामस्थ श्री विनीत गवस आणि गुणेश गवस यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित लढा उभारण्यासाठी एकवटतं आहेत.
        या परिसरातील होणारा निसर्गाचा ऱ्हास थांबवण्यासाठी. अपघात रोखण्यासाठी तसेच परिसरातील निसर्ग, शेती, बग बगायती चे रक्षण करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती श्री विनीत गवस यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed