आताच शेअर करा

दिनांक: १० डिसेंबर २०२५

बांदा: ओंकार हत्तीने आज महाराष्ट्रातली डोंगरपाल येथे एन्ट्री मारलेली आहे.महाराष्ट्रातील
कास, मडूरा, इन्सुली या काही गावात त्यानें बरेच दिवस वास्तव्य केले होते.काही दिवसापूर्वी गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर हा  वास्तव्य करत असताना दिसत होता. आठ दिवसा पूर्वीसीमा लगतच्या भागामध्ये गोव्यात हा फिरत होता.  आज त्याने पुन्हा गोव्याच्या सीमेवरून पलायन करून  महाराष्ट्रात डोंगरपाला येथे दाखल झाला. फकीरफाटा  येथे मंगेश म्हाळवणकर यांच्या बागेत काल रात्री हा ओंकार वास्तव्यास होता तिथे त्याने त्यांच्या बागेत माढ पाडल्याचे समजते.त्यानंतर त्याने आपला मोर्चा डोंगरपालच्या दिशेने वळवून सकाळी ८:३० ते ९ च्या दरम्याने डोंगरपाल येथे दाखल झाल्याचे समजते.गोव्यातील वनविभाग अधिकारी कृष्णा महाले यांच्याशी डोंगरपाल ग्रामस्थासहित बाबुराव परब यांनी  चर्चा केली असता ते म्हणाले की महाराष्ट्र आणि गोव्याची वनविभागाची टीम एकत्रित येऊन त्याला दोडामार्ग येथे नैसर्गिक अधिवासात नेण्याचा प्रयत्न करत आहोत.या वेळी महाराष्ट्र आणि गोवा येथील वन विभाग अधिकाऱ्यांसह  कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed