
दोडामार्ग प्रतिनिधी: गौरी नाईक
दिनांक: १० डिसेंबर २०२५
दोडामार्ग: दोडामार्ग तालुक्यातील शिरंगे खानयाळे पुनर्वसन क्षेत्राला लागुन शिरंगे गावच्या सीमेवरील एका बाजुने काळा दगडाचे उत्खनन होत आहे• सदरचे उत्खनन होत असताना मोठ्या प्रमाणात सुरुंग स्फोट केले जाते असल्याने डोंगराला भेगा पडत आहेत• काही डोंगराला लागुन असलेल्या वस्तीतील लोकांना हादरे सहन करावे लागत आहेत• खानयाळे बाजुच्या डोंगराची माळीनसारखी परिस्थिती उद्भवली आहे• खनिज वाहतुक करणारे डंपर शिरंगे पुनर्वसनमधील गावठण रस्त्यावरुन येजा करतात• दिनांक ११/३/२०२५ रोजी मौजे खानयाळे गावचे ग्रामस्थ यांनी मौजे शिरंगे येथिल प्रतिबंधत दगडखाण क्षेत्रात ची पाहणी केली असता सदर क्षेत्रात खडीक्रशर चालु करण्याच्या हालचाली सुरु असल्याचे दिसुन आल्याने त्या बाबत दिनांक २८/३/२०२५व १७/११/२०२५ रोजी माननीय तहसीलदार दोडामार्ग यांना लेखी कळविण्यात आले परंतु याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.त्यानंतर २१/११/२०२५ रोजी सायंकाळी ५ नंतर संदेश गोविंद गवस यांच्याकडून मोठ्या प्रमाणात सुरुंग स्फोट केले जात आहे. ज्याचे हादरे घरांना सद्यस्थिती घरांना बसत आहेत.रोजच्या रोज सायंकाळी मोठ्या प्रमाणात सुरुंगाचे स्फोट केले जात आहेत.तसेच सदर गौण खनिज वाहतुक खानयाळे वनविभाग यांच्या हद्दीतून अनधिकृतपणे होत आहे. विनापरवाना खानयाळे हद्दीतून वाहतुक करण्यासाठी जमिनीची नासधुस केली जाते .गौण खनिज परवाने तसेच काळा दगड खाणपट्टा परवाने पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्यात यावे.कोणत्याही प्रकारे उत्खनन व वाहतुक होणार नाही याबाबत संबंधितास सक्त सुचना देण्यात याव्यात.तसे निर्दशनास आल्यास संबंधितावर नियोजित कार्यवाही करावे असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.जिल्हाधिकारी यांनी दिलेले निर्देश पुढील प्रमाणे शिरंगे गावातील अल्प मुदत गौण खनिज परवाने व काळा दगड खाणपट्टा परवाने कार्यरत आहेत. सदर काळा दगड खाणपट्टा मुळे तिलारी धरणास तसेच सदर गावातील पाण्यावर विपरीत परिणाम होणार असल्याबाबत कळविले आहे• त्या अनुषंगाने निर्देश देण्यात येते की मौजे शिरंगे ता•दोडामार्ग जि• सिंधुदुर्ग येथिल कार्यरत अल्प मुदत गौण खनिज परवाने तसेच काळा दगड खाणपट्टा परवाने पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्यात यावेत• सदर ठिकाणामधुन कोणत्याही प्रकारे उत्खनन व वाहतुक होणार नाही याबाबत संबंधितास सक्त सुचना देण्यात याव्यात•व तसेच निर्देशनास आल्यास संबंधितावर नियोजित कार्यवाही करून अहवाल या कार्यालयात सादर करावा•संदेश गोविंद गवस यांचे म्हणने असे आहे की आपल्याला तहसीलदार, जिल्हाप्रशासनाने गौण खनिज उत्खननासाठी मंजुरी दिली आहे• याबाबत खानयाळे ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया येत आहेत• तहसीलदार, जिल्हाप्रशासनाने कोणत्या आदेशावरून गौण खनिज उत्खननाला परवानगी दिली,खानयाळे गावातील ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता त्यांची परवानगी न घेता जिल्हाप्रशासनाने संदेश गोविंद गवस यांना गौण खनिज उत्खननाला कोणत्या आदेशावरून परवानगी दिली ,तसेच सदर गौण खनिज वाहतुक खानयाळे व वनविभाग यांच्या हद्दीतून अनधिकृत पणे होत आहे• विनापरवाना खानयाळे हद्दीतून वाहतुक करण्यासाठी जमिनीची नासधुस केली आहे, यावर आवश्यक ती दंडात्मक कारवाई त्वरित न केल्यास त्यांच्या विरुद्ध खानयाळे ग्रामस्थांकडून कायदा व सुव्यवस्थेस बाधा येण्याची शक्यता असुन ग्रामस्थांकडून काही आतर्तायीपणा, वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील व पुन्हा एकदा साखळी उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी•
