
दिनांक: २ /१२/ २०२५
बांदा : प्रतिनिधी
न्यू इंग्लिश स्कूल, मडुरा (ता. सावंतवाडी) येथील विद्यार्थिनी अलिशा राघोबा गावडे हिने विभागीय शालेय हँडबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत बदलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राज्यस्तरावर स्थान मिळवणारी अलिषा ही एकमेव मुलगी ठरली असून तिच्या यशामुळे जिल्ह्याचा आणि प्रशालेचा मान अधिक उज्ज्वल झाला आहे.
विभागस्तर खेळाडू निवड चाचणीत अलिशाने प्रभावी कौशल्य सादर केले. तिच्या या यशात क्रीडा शिक्षक महेश नाईक आणि लवू बांदेकर यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे. तसेच धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी, मुख्याध्यापिका सायली परब, शालेय समिती सदस्य, पालक-शिक्षक संघ, पंचक्रोशीतील सरपंच, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
अलिशाच्या यशामुळे पाडलोस गावासह मडुरा परिसरात आनंदाचे वातावरण असून आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही ती उत्तम कामगिरी करील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
