
दिनांक: २ डिसेंबर २०२५
बांदा : प्रतिनिधी
मुंबईहून मंगलोरकडे जाणाऱ्या मंगला एक्सप्रेसला धडकून बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मडूरा – रेखवाडी येथे घडली. वनविभागाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी शवविच्छेदन केल्यानंतर त्यांच्या अहवालात नंतर दहन करण्यात येणार असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील यांनी दिली. सदर बिबट्या सुमारे १० वर्षांचा असल्याची शक्यता आहे.
