आताच शेअर करा

दिनांक: २५ नोव्हेंबर २०२५

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ आज सावंतवाडी येथील गांधी चौक येथे आयोजित भारतीय जनता पार्टीच्या प्रचार सभेस उपस्थित राहून उपस्थितांना संबोधित केले.

सावंतवाडी नगर परिषदेची ही निवडणूक  सावंतवाडीच्या अस्मितेची, प्रतिष्ठेची व स्वाभिमानाची निवडणूक आहे‌‌. सावंतवाडी शहराशी भोसले राजघराण्याचं अतुट नातं आहे. शहराला खरी ओळख ही या राजघराण्यानेच दिली आहे. त्यामुळे आज राजघराण्याच्या त्या योगदानाची परतफेड करण्याची वेळ आहे. त्यामुळे श्रद्धाराजे भोसलेंसह सर्व भाजपा नगरसेवकांना निवडून देण्याचे आवाहन यावेळी केले.

यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.रवींद्रजी चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. श्रद्धाराजे भोंसले, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, विशाल परब यांसह सावंतवाडी नगरसेवक पदाचे उमेदवार व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed