
दिनांक: २५ नोव्हेंबर २०२५
सावंतवाडी: पालकमंत्री आज सावंतवाडीचे भाजपचे नगरसेवक उमेदवार अनिल निरवडेकर यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी येणार होते सुमारे ११: ००च्या सुमारास पालकमंत्री नितेश राणे साहेब यांचे आगमन झाले.पालकमंत्री येण्यापूर्वी एक इसम सुमारे ७५ वर्षाचा ऍक्टिव्हा गाडी ने आपल्या नाती ला घेऊन शाळेत जात असताना अचानक गाडी घसरून निरवडेकर यांच्या कार्यालयासमोर पडला अचानक त्यांना उचलण्यासाठी घोळका झाला. तेव्हढ्याटच पालकमंत्री साहेबांचे आगमन झाले. घोळका पाहता क्षणी पालकमंत्री तिथे पोचले आणि त्यांनी त्या इसमाला पुढील उपचारासाठी पोलिसांच्या गाडीतून हॉस्पिटल मध्ये पाठवले व त्या नंतर उद्घाटन प्रासंगिक कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ स्वीकारले. नंतर अनिल निरवडेकर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. अशाप्रकारे पालकमंत्री जनतेच्या सोबत आहेत. एक कर्तव्य दक्ष पालकमंत्री असल्याचे जनतेच्या निदर्शनास आले.
