
दिनांक २३ नोव्हेंबर २०२५
कणकवली: असलेल्या जुन्या भाजी मार्केटची जागा नगरविकास खात्याकडे हस्तांतर केली आहे. त्या जागी भव्य भाजी मार्केट, बेसमेंटला पार्किंग सुविधा देणार आहोत, असेही राणे म्हणाले.
कणकवलीच्या विकासाचा पहिला टप्पा आम्ही पूर्ण केला आहे. पुढील टप्प्यात स्विमिंग, क्रिक्रेट, जॉगिंग ट्रॅकसह सुसज्ज स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारणार आहोत. अद्ययावत नगरवाचनालय इमारतीचे काम पूर्णत्वास जात आहे. पूढील ५ वर्षांत कणकवली आणखी विकसित करण्यावर भर देणार आहे. कोविडच्या महामारीत भाजपाचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि नगरसेवकांनी कोविड सेंटर उभारले. गरजू जनतेसाठी मोफत कमळ थाळी सुरू केली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नलावडे आणि आमच्या नगरसेवकांनी जनसेवा केली. खाऊगल्ली, कणकवली पर्यटन महोत्सवासारखे उपक्रम भाजपानेच कणकवलीवासियांसाठी सुरू ठेवले. सत्ता असो अथवा नसो, नगरपंचायतीवर प्रशासक असतानाही कणकवलीत खाऊ गल्ली, पर्यटन महोत्सव सुरूच ठेवला. सत्ताकाळात कुठल्याही नागरी दाखल्यासाठी समीर नलावडे यांनी अडवल्याचा एक कणकवलीकर दाखवा. समीर नलावडे यांनी कणकवली शहर हे आपले घर मानून जनसेवा केली. विरोधकांनी कितीही टीका केली तरी आम्ही केवळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतोय. कणकवली शहर शांत शहर म्हणून बनविण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न केले आहेत.
त्यामुळे विरोधकांनी कितीही आरोप केले तरी भाजपा कणकवलीच्या विकासासाठी मतदारांकडे जाणार आहे, असेही राणे म्हणाले.
