
दिनांक: १८ नोव्हेंबर २०२५
बांदा प्रतिनिधी:
श्री. विष्णू नारायण गावकर पुरस्कृत तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा नट वाचनालय बांदा येथे दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न झाली.
या स्पर्धेत माध्यमिक विद्यालय डेगवेची इयत्ता सातवी तील विद्यार्थीनी कु. समृद्धी जयराम देसाई हिने प्रथम क्रमांक पटकावला.
कु. समृद्धीचे तसेच तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे संस्था अध्यक्षा मा. कल्पनाताई तोरसकर, कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, समन्वय समिती सचिव मा. रश्मीताई तोरसकर तसेच सर्व संस्था पदाधिकारी आणि प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.
