आताच शेअर करा

दिनांक: १६ नोव्हेंबर २०२५

बांदा प्रतिनिधी: महावितरणाचे बांदा वीज अभियंता श्री ठाकूर यांच्या मनमानी कारभारामुळे मडूरा येथील गॅरेज व्यावसायिक प्रीतेश गवंडे यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

सविस्तर बातमी अशी की गाव मौजे मडूरा तिठा येथून सातोसे सातार्डा रस्ता क्रमांक. ६३ ग्रामीण मार्गाच्या रस्त्याच्या बाजूला महावितरणाने ११ हजार हॉल्टेजची विद्युत वाहिन्या व पोल मडूरा येथून सातार्डा या दिशेने जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूने घातल्या  आहे. विद्युत वाहिन्या ओढून काम पूर्ण केले होते. आणि सातार्डा दिशेने काम पुढे चालू होते.

परंतु ठाकूर यांनी  विरोध असताना आपल्या उपजत अक्कल बुद्धीने अथवा इतर कारणाने सदर रस्त्याच्या डाव्या बाजूने गॅरेज मालक प्रितेश गवंडे यांचा विरोध असताना गॅरेजच्या व वॉशिंग सेंटरच्या वरून दिनांक: ११/११/२०२५ लाईन घातली गेली.
गॅरेज मालकाने विरोध केला असता तुझ्या गॅरेज मधील लाईट कनेक्शन काढून टाकीन अशी उपस्थितांसमोर खुली धमकी दिली.
सदर विद्युतवाहिनी ही ११ हजार होल्टेजने प्रवाहित होणार आहे. वाहिनीच्या खाली गॅरेज, वॉशिंग सेंटर चे काम करत असल्याने सदर गॅरेज व्यवसाय  श्री.गवंडे व कामगार यांच्या जीवितस धोका आहे. असे असूनही  अभियंता ठाकूर हे जबरदस्तीने धमकी देऊन काम करत आहे. भविष्यात धोका निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल गॅरेज मालक प्रितेश यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. धमकी देऊन जबरदस्तीने काम करणे ही आज्ञा महावितरण देऊन काम करून घेते का ? असा ही सवाल गवंडे यांनी उपस्थित केला . ही लाईन न बदलल्यास मी बांदा येथील महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडणार असल्याचे गॅरेज मालक गवंडे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed