
दिनांक: १८ ऑक्टोबर २०२५
बांदा प्रतिनिधी: मडूरा – रेडकरवाडी येथील श्रीमती काशीबाई कृष्णा माधव (७५) यांचे अल्पशा आजाराने मुंबईत उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, विवाहित मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी सैनिक चंद्रकांत माधव आणि कोकण व्हिजन न्यूज चॅनेलचे संपादक यशवंत माधव यांच्या त्या आई होत.
