
दिनांक: १७ ऑक्टोबर २०२५
तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे
शिरोडा: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेली निष्ठा, आदर, प्रेम, यामुळेच आर्या परब आणि तन्वी परब यांनी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून मानले जाणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची एका कल्पवृक्षावर अप्रतिम कलाकृती सादर केली असून महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
कलाही कोणालाही विकत घेता येत नाही ती अंगी असावी लागते. त्याचं एक उदाहरण म्हणजे या दोन बहिणींनी साकारलेली कलाकृती. या चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची कलाकृती सादर करून समाजासमोर एक मोठा आदर्श निर्माण केला आहे. त्यासोबतच स्वतः दोघांनी मेहनत घेऊन नजर टिपून घेणारे गड किल्ले पण बनवले आहेत.
त्यांनी आपल्या कलेतून समाजाला एक चांगली प्रेरणा दिलेली आहे. या कलेचा सर्व स्तरावर कौतुक केलं जात असून दोन्ही बहिणींना प्रोत्साहन मिळत आहे.