
२३ ऑगस्ट २०२५
(गोवा ):हरमल प्रतिनिधि
खेळाच्या माध्यमातून धैर्यवान पिढी घडते. खेळ हा व्यक्तिमत्व विकस्नाचा अत्यंत महत्वाचा भाग असल्याने प्रत्येक मुलांनी क्रीडा क्षेत्राकडे गाभीर्याने पहावे. क्रीडा क्षेत्रातील अव्वल कामगिरी ही केवळ खेळाडूसाठी अभिमानाची बाब नसून राज्य आणि देशाचा तो गौरव आहे, असे प्रतिपादन क्रीडा व युवा व्यवहार खात्याचे गोवा राज्य क्रीडा संघटक अनंत सावळ यांनी केरी पेडणे येथे केले.
न्यू इंग्लिश हायस्कुल आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या नात्याने व्यासपीठावरून सावळ बोलत होते. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर, शारीरिक शिक्षक आल्फ्रेड रॉड्रीगीज, सर्वेश कोरगावकर व विद्यार्थी मंडळाची क्रीडा मंत्री साक्षी वेंगुर्लेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी दिपप्रज्वलन व मेजर ध्यानचंड यांच्या प्रतिमेला मान्यवाराच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी खेळाचे महत्व विषद करणारी नातिका, माहिती, भारतीय खेळाडूचे क्रीडा योगदान, विविध खेळाची ओळख करून देणारा क्रीडा फॅशन शो आदिचे यावेळी सादरीकरण करण्यात आले.
मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले प्रत्येकाचे अथक परिश्रमाने स्वतःचे भवितव्य घडवण्यासाठी स्वतः बद्दल सजग रहावे. यश मिळवण्यासाठी परिस्थिती पेक्षा वैयक्तिक मनस्थिती महत्वाची असते. मनस्थिती साभाळली कि परिस्थिती आपोआप बदलते. खेळ बेकार म्हणायचे दिवस मागे पडले असून खेळमुळे आज नाव लौकिक, पैसा चालून येतो. प्रत्येकाने शिस्त, चिकाटी, जिद्दीने सामोरे जावे.
स्वागत व परिचय सर्वेश कोरगावकर यांनी केला. सूत्रसंचालन ई. १०वीची विद्यार्थिनी सिद्धी नाईक हिने केले. आभार साक्षी वेंगुर्लेकर हिने मानले. यानंतर मुलानी विविध देशी, मैदानी व मनोरंजन खेळात प्रत्यक्ष सहभागी होऊन राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला.