आताच शेअर करा

दिनांक: १९ ऑगस्ट २०२५

भेडशी प्रतिनिधि: गौरी नाईक

काल दिनांक १८ ऑगस्ट रोजी भेडशी उसप- येथे मुसळधार पावसामुळे घर जमीनदोस्त झाले. उसप सरकारवाडा येथिल प्रेमावती सखाराम नाईक वय वर्ष ७६ यांचे
दुपारी १ ते १:३० च्या दरम्यान अतिवृष्टीमुळे त्यांच्या घरातील सर्व भिंती कोसळून घरातील  साहित्य  जमीनदोस्त झाले, त्यांच्या समोर ऐन पावसाळ्यात राहते घर पडल्याने त्यांचा निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रभावती या   दिव्यांग असून एका हाताने त्यांना काम करता येत नाही. त्यांची आथिर्क स्थिती हालकीची असून त्यांचे घर कोसळल्याने त्यांच्यावर आभाळ कोसळले आहे. त्यांच्या उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने भर पावसाळ्यात त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed