
दिनांक: २२ ऑगस्ट २०२५
बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर
कोकण कॅन्सर अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कुडाळ, मातृत्व मेडिकल स्टोअर बांदा, रोटरी क्लब ऑफ बांदा, रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा व ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला रुग्णांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ९४ जणांची आरोग्य चिकित्सा करण्यात आली.
मातृत्व मेडिकल येथे संपन्न झालेल्या या शिबिराचे उद्घाटन कर्करोग तज्ञ डॉ. आदेश पालयेकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, रोटरीचे अध्यक्ष शिवानंद भिडे, कार्यक्रम अधिकारी विराज परब आदी मान्यवर उपस्थित होते. शिवानंद भिडे यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. आदेश पालयेकर यांनी कॅन्सर हॉस्पिटलबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. कर्करोग हा बरा होणारा आजार असून याबाबत कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. कुडाळ येथील रुग्णालयात महाराष्ट्र शासनाची योजना कार्यान्वित असून रुग्णांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. अन्वर खान यांनी ज्येष्ठ नागरिक संघाला कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिताली सावंत यांनी केले. आभार गुरुनाथ नार्वेकर यांनी मानले.
सदर शिबिरात ९४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी रोटरी क्लबचे आनंद गवस, संतोष सावंत, बाबा काणेकर, फिरोज खान, प्रमोद कामत, सुनील राऊळ, स्वागत नाटेकर, मंदार कल्याणकर, संजय शिरोडकर, पत्रकार निलेश मोरजकर, प्रवीण परब, रोटरॅक्ट क्लबचे संकेत वेंगुर्लेकर, नेहा निगुडकर, ईश्वरी कल्याणकर, दिया गायतोंडे, दत्तराज चिंदरकर, साहिल बांदेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे हनुमंत सावंत, अंकुश माजगावकर, अशोक परब, नागेश सावंत, प्रकाश पाणदरे, सुभाष नाईक, महादेव वसकर आदी उपस्थित होते.