आताच शेअर करा

दिनांक: ५ जुलै २०२५

बांदा  प्रतिनिधि:  अक्षय मयेकर

रोटरी क्लब बांदा च्या युवा विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोट्रॅक्ट क्लब बांदा च्या नवीन कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ आनंदी मंगल कार्यालय येथे पार पडला. यात नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून  रोहन कुबडे यांची निवड करण्यात आली. तसेच सचिव पदी डॉ.मिताली सावंत तर सहसचिव पदी संकेत वेंगुर्लेकर आणि खजिनदार पदी शिवम गावडे यांची निवड करण्यात आली. या वर्षात अधिकाधिक समाज उपयोगी उपक्रम आम्ही राबवू असे रोहन कुबडे म्हणाले. त्याच प्रमाणे अभिराम या जिल्हा संकल्पनेने प्रेरित होऊन येत्या वर्षभर विविध धर्म जागृती कार्यक्रम पण घेऊ  तसेच युवा पिढीने रोट्रॅक्ट सोबत येऊन सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हावे असे श्री कुबडे म्हणाले. यावेळी व्यासपीठावर नवीन रोट्रॅक्ट जिल्हाध्यक्ष हर्ष शिंदे,RSAMDIO चे उपाध्यक्ष अनिकेत जाधव, रोटरी अध्यक्ष शिवानंद भिडे,माजी रोट्रॅक्ट अध्यक्ष अवधूत चिंदरकर, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिम्पल कुबडे  व संकेत वेंगुर्लेकर यांनी केले तर आभार डॉ मिताली सावंत हिने मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed