आताच शेअर करा
सुशील मेस्त्री( सांगेली)/ अभिषेख नाईक (तळवडे)

दिनांक: ३१ मे २०२५

संपादकीय : सिंधुदुर्ग

      मंगळवारी दिनांक २७ मे रोजी शीतल प्रकाश कुर्डीकर या भगिनीला बायपास सर्जरीचेवेळी GMC बांबोळी येथे ए पॉझिटिव्ह रक्ताची आत्यन्तिक आवश्यकता होती, ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या समूहावर संस्थेचे सचिव बाबली गवंडे यांनी याविषयीची पोस्ट पाठविताच संस्थेचे ऑन कॉल रक्तदाते अभिषेक नाईक (तळवडे) यांनी त्यांच्याशी संपर्क साधून ताबडतोब सदर दिवशी सकाळी वादळ, वारा, पाऊस याचा विचार न करता GMC बांबोळी रक्तपेढीमध्ये स्वतःच्या मोटारसायकलने जाऊन आपले आत्तापर्यंतचे सहावे रक्तदान केले. त्याचप्रमाणे मातोंडचे आमचे ऑन कॉल रक्तदाते देवेश परब हे जाण्यासाठी तत्पर होते, पण पोस्ट पूर्ण झाल्याने त्यांना तूर्तास राखीव ठेवण्यात आले.
      त्याचप्रमाणे याच दिवशी राजश्री मेस्त्री, वेर्ले ता. सावंतवाडी सध्या रा.म्हापण वेंगुर्ले येथील पेशंटसाठी एबी पॉझिटिव्ह रक्ताच्या किमान चार बॅग्जची GMC बांबोळी येथे आवश्यकता होती. यावेळी ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गचे नियमित ऑन कॉल बी पॉझिटिव्ह रक्तदाते सुशील मेस्त्री (सांगेली) यांच्याशी ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे कार्याध्यक्ष महेश रेमुळकर यांनी संपर्क साधताच ताबडतोब सुशील मेस्त्री यांनी GMC बांबोळी रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. त्यांचे हे आतापर्यंतचे नववे रक्तदान होते.
      विशेष म्हणजे संस्थेचा लोगो व नाव असलेले टी-शर्ट घालूनच सुशील मेस्त्री हे रक्तदान करण्यासाठी गेले होते. ते टी-शर्ट पाहूनच ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गचा रक्तदाता असल्याचे समजल्यावर GMC रक्तपेढीच्या स्टाफ मेंबर्सनी सुशीलजींना माहिती देण्याआधीच ओळखलं आणि व्यवस्थित सेवा दिली.
   त्याचप्रमाणे सार्थक फौंडेशनचे संयोजक सुदेशजी नार्वेकर यांच्या माध्यमातून तीन रक्तदात्यांनी सकाळीच रक्तदान केले.
         नातेवाईकांनी अभिषेक नाईक, सुशील मेस्त्री, देवेश परब यांच्यासहीत इतर तीन रक्तदाते तसेच महेशजी रेमुळकर आणि सुदेशजी नार्वेकर तसेच दोन्ही संस्थांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *