आताच शेअर करा
फोटो:-
देगवे येथे माध्यमिक विद्यालयात आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यात उपस्थित असलेले माजी विद्यार्थी शिक्षक वृंद व मान्यवर.
     .

दिनांक: २१ मे २०२५

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर


     विद्यार्थी नेहमी सांगतात शिक्षकांनी आम्हाला घडवलं, पण खरं तर विद्यार्थ्यांमुळे आम्ही शिक्षक घडलो. तुमच्या जीवनात तुम्ही जे काम करता ते आनंदाने करा. कामाचा आनंद घ्या म्हणजे त्यात सकारात्मकता येईल. पैसा संपत्ती मिळवत चैनीचे आयुष्य सारे जगू पाहतात. पण आपण या समाजात राहतो या समाजाचा देणं लागतो, याचं भान असू द्या. आपल्या कमाईतील ठराविक रक्कम सामाजिक कार्यासाठी द्या. तुमच्या मुलांनाही हे समाज भान राहू द्या असे उद्गार माजी मुख्याध्यापक प्रभाकर तेली यांनी डेगवे येथे काढले.
    डेगवे येथील माध्यमिक विद्यालयाच्या सन २०००-२००१ या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्ष स्थानावरून श्री तेली बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भरत देसाई, पी. पी. देसाई, श्री परब एन टी सावंत, प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सावंत, उत्तम देसाई श्री गिरप आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या बॅचमधील निधन झालेले माजी विद्यार्थी आनंद जाधव, दीपा मेस्त्री, बाबाजी गावकर, राजू शिंदे तसेच शिक्षक जी ए देसाई, मायबा देसाई, सदाशिव गाड सुरेश मणेरकर, शिक्षकेतर कर्मचारी नकुळ देसाई, अनंत तोरस्कर गुंडू कांबळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
    बालपणीच्या आठवणीत रमत शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांचा परिपाठ घेतला. तेली सरांसोबत ‘आला पाऊस पाऊस’ या गाण्यावर सर्वांनी ठेका धरत बालपण पुन्हा अनुभवले. यावेळी माजी विद्यार्थी धनश्री रीना निलेश अरविंद अमित दादा समीर यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञ होत शिक्षकांना श्रीफळ गुलाबपुष्प व भेटवस्तू दिल्या. तसेच प्रशालेची गरज ओळखून शाळेला इन्व्हर्टर भेट देण्यात आला.
     या स्नेह मेळाव्यात धनश्री गवस रीना मोरजकर उमिका नार्वेकर राजश्री कर्पे, वनिता देसाई, प्रमिला देसाई प्रशांति देसाई संध्या देसाई सुशीला राऊत तृप्ती गवस अमित देसाई सखाराम देसाई सिद्धेश देऊलकर निलेश देसाई बाबाजी पवार गणपत देसाई, उमेश ठाकूर अरविंद गावकर सागर स्वार, आत्माराम तर्फे सुर्यसेन ठाकूर पदु शिंदे, सुनील देसाई गुरुदास ठाकूर समीर ठाकूर, फ्रान्सिस फर्नांडिस विनायक देसाई, तेजस हडफडकर आधी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक रीना मोरजकर यांनी केले. आभार निलेश देसाई यांनी मानले.
    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed