आताच शेअर करा
फोटो
केरी पेडणे येथे न्यू इंग्लिश हायस्कुलच्या दहावीतील गोवा बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या विद्यार्थांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुण्या बर्था फर्नांडिस, व्रजेश केरकर व व्यवस्थापन मंडळ , पालक शिक्षक संघ व विद्यार्थी.

दिनांक: १० मे २०२५

गोवा (हरमल)
केरी पेडणे येथील न्यू इंग्लिश हायस्कुलच्या इयत्ता १०वीचा १०० टक्के निकाल लागल्याबद्दल दहावीतील यशवंत विद्यार्थ्यांचा शालेय व्यवस्थापन आणि पालक शिक्षक संघटनेतर्फे गौरव करण्यात आला.

न्यू इंग्लिश हायस्कुलच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या माजी मुख्याध्यापिका बर्था फर्नांडिस, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व्रजेश केरकर, उपाध्यक्ष विठ्ठल गडेकर, खजिनदार मिलिंद तळकर, व्यवस्थापक शैलेंद्र कुबल, सहसचिव दत्ताराम नाईक, कार्यकारी सभासद सूरज तळकर, बाबुसो तळकर, राजन सावळ, देवेंद्र गाड, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष अमृत पेडणेकर, उपाध्यक्षा संजना तळकर, सुप्रिया केरकर, मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन सन्मानीत करण्यात आले.

याप्रसंगी बर्था फर्नांडिस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, दहावी ही शैक्षणिक यशाची पहिली पायरी आहे. पदवी शिक्षणासोबत प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतः गुणवान होऊन समजतात संवेनशिलपणे वागणे आणि उत्तम नागरिक होणे हेच शिक्षणाचे साफल्य होय असे म्हटले.

शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्रजेश केरकर आणि मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यांनीही आपल्या प्रासांगिक भाषणातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे निवेदन वैशाली न्हानजी यांनी केले. तर शेवटी मिताली हरमलकर हिने ऋणनिर्देश व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *