आताच शेअर करा

दिनांक: १० मे २०२५

सावंतवाडी: महायुतीच्या माध्यमातून  भालावल गाव लहान असला तरी या गावाच्या विकासासाठी महायुतीच्या आतापर्यंत भरघोस निधी देण्यात आला आहे. विकासाच्या बाबतीत या गावाला झुकते माप देण्यात आलेले आहे. त्यामुळे यापुढेही या गावाच्या प्रलंबित विकासासाठी शिवसेनेच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. असे आश्वासन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी भालावलवासियांना दिले  दिले.
  भालावल येथे आयोजित कार्यक्रमात संजू परब बोलत होते. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनायक दळवी, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उद्योजक भाऊ वळंजु, तांबोळी माजी सरपंच अभिलाष देसाई, निगुडे माजी सरपंच झेवियर फर्नांडिस, विलवडेचे शिवसेना उपतालुका प्रमुख सोनू दळवी, भालावल सरपंच समीर परब, डॉ सुभाष सावंत डॉ अर्चना सावंत, भालावल देवस्थानचे मानकरी राजाराम परब, वसंत परब, रमेश परब, भालावल मुंबई मंडळाचे अध्यक्ष यशवंत देसाई, उपाध्यक्ष विजय परब, देवस्थान कमिटी अध्यक्ष अशोक परब सचिव व वामन परब, उपाध्यक्ष विजय परब, खजिनदार उदय परब आदी उपस्थित होते.
         यावेळी विनायक दळवी यांनीही माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून भालावल गावातील प्रलंबित विकास कामासाठी शिवसेनेच्या माध्यमातून निधी देण्याची ग्वाही दिली. यावेळी भालावल सातेरी देवस्थानच्यावतीने संजू परब, विनायक दळवी, गणेशप्रसाद गवस, भाऊ वळंजू, झेवियर फर्नांडिस, डॉ सुभाष सावंत, डॉ अर्चना सावंत सावंत शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच समीर परब यांनी ग्रामस्थांनी प्रलंबित विकास कामाबाबतचे निवेदन संजू परब यांना दिले.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन उदय परब यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *