आताच शेअर करा

तळवणे  प्रतिनिधी: शंकर गावडे

दिनांक: २९ एप्रिल २०२५

शिरोड्यामध्ये पाकिस्तानचा झेंडा जाळत पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध करत संतप्त नागरिकांनी पाकिस्तान विरुद्ध आक्रमक पवित्रा दाखवला. पाकिस्तान विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. शाहिद झालेल्या पर्यटकांना मेणबत्त्या पेटवून आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

  दहशदवाद्यानी पहलगाम येथे झालेल्या चकमकीत २८ निष्पाप नागरिकांचे बळी घेतले. या घटनेवर इर्शाद शेख म्हणाले कि, हा हल्ला भारतीय नागरिकांच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला आहे. दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचा भारतीय सरकारने योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी सरकारकडे केली.

यावेळी रेडी जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अभिजीत राणे, काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख,  शिरोडा काँग्रेस अध्यक्ष जगन्नाथ गावडे,  निलेश मयेकर,  कौशिक पांडुरंग परब, बाळा जाधव, पंकज मसुरकर,  राम परब, श्रवण गावडे, विकास कावळे,ओम परब, शिवसेना शाखाप्रमुख राकेश परब, वेंगुर्ला युवा सेना उपतालुका प्रमुख रोहित पडवळ,  शेखर झाटीये विराज राऊत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed