
दिनांक: २६ एप्रिल २०२५
पेडणे (प्रतिनिधी)
चांदेल हसापूर येथील हुतात्मा बापू गावस सरकारी हायस्कूलच्या शालांत परीक्षेचा शंभर टक्के निकाल लागल्यामुळे उन्नत भारत ज्ञान प्रसारक मंडळ कॉलेज आणि रिसर्च सेंटर रोटरी क्लब पणजी यांच्यामार्फत यशवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
यावेळी चांदेल हसापूर सरपंच तुळशीदास गावस , मुख्याध्यापक यदुनंद देसाई ,नामदेव तुळसकर संस्थेचे डॉक्टर राजेश पेडणेकर,आदी उपस्थित होते.
यावेळी सिद्धी सिताराम परब, देवनाश मलिक, मयुरेश प्रकाश परब, तोपीक अबू साप, भगवान भावेश परब, नकुल भाईप, चंद्रकांत महेश केणी, आदिती सुरेंद्र नाईक, प्रदीप प्रकाश मालकर ,युवराज गणेश मलिक, दिव्यता नागेश मळीक, महादेव मळीक, कृष्णा मळीक, तन्मय मधुसूदन मराठे, मंगेश दीपक हरिजन, जयेश परशुराम, आशीर्वाद आनंद नाईक, शंभू गिरीश मळीक, सिया नारुलकर मानसी आत्माराम मलिक या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.