तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे
दिनांक: १२ एप्रिल २०२५
अणसूर येथील श्री देव दाडोबा कलशारोहण सोहळा दि.१३ एप्रिल २०२५ रोजी सुरू होत असून दि. १५ एप्रिल २०२५रोजी संपन्न होणार आहे. अणसूर हे वेंगुर्ला तालुक्यातील एक निसर्गरम्य गाव आहे. अणसुर गावातील श्री देव दाडोबा एक जागृत देवस्थान मानले जाते. श्री देव दाडोबा कलशारोहण सोहळ्यानिमित्त अनेक प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
त्यामध्ये रविवार दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ०७:३० ते दुपारी १:३० वाजेपर्यंत गणपती पूजन, मंगलाचरण, देवतांना आमंत्रण, सामुदायिक प्रार्थना, संप्रोक्षण विधी, होम, मंत्रपुष्पांजली आरती, दुपारी १२.००वाजल्यापासून ०४.०० वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम चालू असणार सायंकाळी ०६:००वाजता स्थानिक मंडळांची भजने होतील. रात्री ०८:०० वाजता श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ यांचा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. त्यानंतर दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ०७:३० वाजता मंगलाचरण आवाहित देवता पूजन झाल्यानंतर १० वाजून ५५ मिनिटांनी शिखर कलश प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे.
अशा प्रकारचे बरेच कार्यक्रम तीन दिवस खालचे अणसुर येथील श्री देव दाडोबा मंदिरात चालू असणार आहेत. सर्व सर्व भाविक भक्तांनी व नाट्य रसिकांनी श्री देव दाडोबाचे दर्शन घ्यावे तसेच या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
