आताच शेअर करा

दिनांक: १२ एप्रिल २०२५

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर

भाजप बांदा शहर तर्फे बांदा मंडल क्रीडा संयोजक गुरु कल्याणकर, महिला शहराध्यक्ष स्मिता पेडणेकर व महिला शहर उपाध्यक्ष माधवी गाड यांच्या संयुक्त विद्यमाने खास महिलांकरिता मोफत रक्त तपासणी शिबिर आयोजित केले होते. तब्बल ९८ महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात Lipid profile,CBC(हीमोग्लोबीन, लाल पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेटस्), PCR( सर्व कोलेस्टॉल टेस्ट), KFT( किडनी फन्शन टेस्ट), LFT(लिवर फन्शन टेस्ट), थायरॉईड व रुग्णाकरिता आवश्यक सर्व रक्त तपासण्या मोफत केल्या गेल्या.


भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. श्वेताताई कोरगावकर व बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्याकडून दीपप्रज्वलन करून सदर शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना श्वेता कोरगावकर यांनी सांगितले की, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.त्याकरता अशी रक्त तपासणी वर्षातून एकदा करायलाच हवी. असे त्या म्हणाल्या.
यावेळी बोलताना गुरु कल्याणकर यांनी सांगितले की,महिला वर्गाचा शिबिरासाठीचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता असे शिबिर बांदा शहरातील प्रत्येक वार्ड मध्ये लावण्याचा पक्षाचा मानस आहे. प्रत्येक वार्डमधील महिला वर्गाच्या मागणीनुसार निश्चितपणे पुढील शिबिरे लावण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच आबा धारगळकर, बांदा मंडल क्रीडा संयोजक गुरु कल्याणकर, महिला शहराध्यक्ष स्मिता पेडणेकर, महिला शहर उपाध्यक्ष माधवी गाड, शहराध्यक्ष बाबा काणेकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे,तनुजा वराडकर, व्यंकटेश ऊरुमकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *