
बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर
दिनांक: ११ एप्रिल २०२५
मडूरा तिठा येथील श्री हनुमान मंदिरात शनिवार १२ एप्रिल रोजी हनुमान जयंती सोहळा साजरा होत आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळी श्री हनुमान पूजाअर्चा, अभिषेक व अन्य धार्मिक कार्यक्रम होतील. त्यानंतर श्रीसत्यनारायण महापूजा, दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. सायंकाळी स्थानिकांची भजने व सायंकाळी ७ वाजता अमृतनाथ दशावतार मंडळाचा विठ्ठल भक्तीवर आधारित ‘संत गोमाई’ हा संतकालीन पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री हनुमान देवस्थान समिती रोणापाल – मडूरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.