आताच शेअर करा

दिनांक: ३ एप्रिल २०२५

न्हावेली /वार्ताहर

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व त्यांची शौर्यगाथा सांगणारा चित्रपट छावा प्रदर्शित झाला आहे. अभिनेता विकी कौशल व तेलगू अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाला महाराष्ट्रासह इतर राज्यांत प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा या हेतूने न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर, नितेशा नाईक, नाना नाईक, रेश्मा नेमण,रोहित निर्गुण,सिद्धेश पार्सेकर यांच्या सहकार्यातून, तुळशीदास चंद्रशेखर पार्सेकर यांचे घरी शुक्रवार दिनांक ४ एप्रिल रोजी रात्रौ ठीक ८.०० वाजता मोफत दाखवण्यात येणार आहे. ग्रामस्थांसह सर्व शिवप्रेमींनी चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छञपती संभाजी महाराज यांचा चित्रपटाद्वारे दाखविण्यात आलेला इतिहास पाहावा,असे आवाहन न्हावेलीचे उपसरपंच अक्षय पार्सेकर व ग्रामस्थ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *